Nest Constrution
 
Welcome to Nest Construction

Testimonial


      "आमच्या डॉक्टरी क्षेत्रातल्या विख्यात इएनटी सर्जन वंदना जोशी यांचा आणि माझा परिचय तसा बराच जूना आहे. त्यांचे पती मि श्री. चारुदत्त जोशी यांना देखील ओळखतो मात्र ती ओळख अगदीच नावपुरती. सदाशिव पेठेमधे लिजहोल्ड बेसिस वर एक प्लॉट माझ्याकडे होता. त्याच्यावर असलेला बंगला गेली कैक वर्षे वापरातच नव्हता. प्लॉटचा मूळ मालक आणि मी यांच्यामधील लीज एग्रीमेंट संपायला अगदी थोडी वर्ष उरली होती.
      अशावेळी जोशी कुटुंबाचा आणि माझा एक कॉमन मित्र आणि रियल एस्टेट एजंट आहे, तो श्री चारु जोशी यांना अप्प्रोच झाला. त्यांनी देखील उत्साहाने या प्रोजेक्ट मधे रस घेतला आणि केवळ दोन - तीन औपचारिक बैठकीतच त्यांनी त्या बंगल्याची ऑफर आम्हाला पाठविली. वास्तविक माझ्या बहुतेक आप्तेष्टानी एकूणच ही प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची, किचकट अन वेळखाऊ असल्याचा आणि सावधगिरीचा इशारा देऊन ठेवला होता. ऑफर देताना तर प्रत्येकच बिल्डर आपला उत्साह दाखवितात, पण इथेच पहिल्यांदा आम्हाला चारु जोशीच अस्सलपन जाणवल. टॉपमोस्ट प्रायोरिटिवर मालकसोबतचे व मालकाच्या वकीलानसोबतचे सगळे कायदेशीर व्यवहार, आम्हा दोघांनाही कधीही कुठलेही खटके खाचखळगे न जाणवु देता. अतिशय शांतपणे सुरळीत पार पाडले. ताणतणाव निर्माण होईल अशा एकाही प्रसंगाला कोणालाही सामोरे जाव लागल नाही.
      संपूर्ण व्यवहार स्वच्छ, सुष्पष्ट आणि कागदोपत्री पारदर्शी ठेऊन त्यांनी लीजहोल्डर, डेवलपर आणि माझ्यामधे एक ट्रायपार्टाइट एग्रिमेंट करवल. त्याहुन महत्वाचे म्हणजे त्यांनी अक्षरशः एकहाती आणि कमीत कमी वेळामधे हे सगळ यशस्विरित्या घडवून आणल. आता जिथे एक अत्यंत देखणी इमारत दिमाखात अभी आहे आणि नवनवीन परिवाराच्या हसण्याखेळण्याने नांदती - गजबजति झाली आहे. आजदेखील काळे हे एकच कुटुंब नव्हे, तर आमच्या जुन्या मालकाच्या मनांतदेखील कृथार्ततेची एकच भावना आहे. आमची प्रॉपर्टी अत्यंत योग्य माणसाच्या हातून डेव्हलप झाली! ज्या क्षणी मि ही प्रॉपर्टी श्री. चारु जोशिकरवी डेव्हलप करायची ठरवली, त्या क्षणाचा आणि अर्थातच जोशी परिवाराच्या मि मनस्वी आभारी आहे."

डॉ. सुधीर काळे ( " भाग्यलक्ष्मी " बंगला मालक, आता " पसायदान ")